Pimpri : माथेरानमध्ये झाड रिक्षावर कोसळले

माथेरान : माथेरानच्या काळोखे परिसरात सोमवारी (दि.१४ जुलै) सकाळी मोठा अपघात घडला. पावसामुळे भिजलेल्या मोकळ्या मातीतून एक झाड मुळासकट उखडून ई-रिक्षावर कोसळले. या अपघातात रिक्षाचालक प्रशांत गायकवाड आणि प्रवासी मनोज जांभळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने माथेरान बिझी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच या अपघातात दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
झाड कोसळल्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, ही दुर्घटना स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः रिक्षावर झाड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. आजच्या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याने ई-रिक्षा मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून आणि रिक्षाचालक संघटनांकडून प्रशासनाने तात्काळ आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, तसेच चालक आणि प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
माथेरानची भौगोलिक परिस्थिती आणि ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार माथेरानमध्ये ही ई-रिक्षा सुरू आहे, परंतु येथील खड्डेरहित रस्त्यांमुळे सतत वाहनाची दुरूस्ती करावी लागत असताना आज रिक्षावर झाड पडून रिक्षचे मोठा नुकसान झाले आहे. त्यामुळे रिक्षा मालकांना मोठा आर्थिक संकट उभा राहिले तरी प्रशासनाने याबाबत नुकसान भरपाई द्यावी, ही विनंती
– प्रवीण गायकवाड, ई – रिक्षा मालक





