Pimpri : वृक्षसंवर्धन ही काळाची गरज : प्रा आल्हाट
Updated On:

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांच्या वतीने मोशी परिसरात वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
मोशीतील विविध सोसायट्यांमध्ये महिला, जेष्ठ नागरिक, युवक यांच्या हस्ते विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी व छायादायक वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनासाठी आपली बांधिलकी दाखवली.
यावेळी बोलताना प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या की, वृक्षसंवर्धन व जतन ही काळाची गरज आहे. झाडांपासून मिळणारा प्राणवायू हा मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण राहतो तो परिसर स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार ठेवण्यासाठी सामूहिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.





