वैद्यकीय सेवा पथकांकडून वारकऱ्यांवर उपचार

संत गुलाब बाबा भक्त मंडळाकडून वारकऱ्यांसाठी मसाला खिचडी वाटप
इंदापूर – श्री गोपाल कृष्ण गोसेवा व अनुसंधान केंद्र कानशिवनी जिल्हा अकोला येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत, गेल्या 33 वर्षापासून लाखो वारकऱ्यांना सेवा पुरवणारे फिरते मोफत वैद्यकीय सेवा पथकाने, गुरुवारी (22 जून) औषधी सेवा व अन्नदान तसेच उपचार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकऱ्यांवर केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर शहरात एकदिवसीय मुक्कामासाठी विसावला. गुरुवारी सकाळच्या प्रहरातच, गोपाल कृष्ण गोसेवा अनुसंधान केंद्राच्या वारकऱ्यांची चरण सेवा व शिरावाटप इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
मिस्टान्न वितरण, रुग्णाचिकित्सा, नेत्र चिकित्सा, चष्मा वितरण, चरण सेवा, मलमपट्टी, विशेष होमिओपॅथी उपचार डॉक्टरांचे पथक प्रमुख डॉक्टर राजकुमार बुले, डॉ. विद्याधर वणवे (अकोला), डॉ. भुलेश्वर बिडवे (संभाजीनगर), डॉ. रमेश बर्डे (कानशिवनी), डॉ. गीता घंगाळे (अंदुरा), डॉ. राधा पारस्कर (अकोला), वैद्यकीय अधिकारी प्रणाल पाटील (पुणे), मुकुंद साठे नेत्र तज्ञ(अकोला), डॉक्टर जनार्दन वानखडे(शेगाव), डॉ. मंगेश कोल्हटकर (अमरावती), डॉ. अमोल दिवाणे यवतमाळ, या डॉक्टर पथकाने वारकऱ्यांना सेवा दिली.
संत गुलाब बाबा भक्त मंडळ यांच्या वतीने वारकऱ्यांना मसाला खिचडी तसेच चहा दूध वाटप, बुलडाणा जिल्ह्यातील सिद्धेश्वर संत गुलाबबाबा संस्थान काटेलचे अध्यक्ष नंदकुमार पालुंदरकर तसेच शिवशाहीर हभप मुरलीधर लोणाग्रे, राजू कमलाकर व संत गुलाब बाबा समाधी मंदिर, अंजनगाव सुर्जी येथील विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
इंदापूर अकलूज रस्त्यावरील दोशी फार्म हाऊस येथे, मे. चंद्रकांत स्वरूपचंद शहाचे सर्वेसर्वा संजय दोशी, ईशांत दोशी यांनी अन्नदान करत हजारो वारकऱ्यांची मुक्कामची व्यवस्था केली. श्रीक्षेत्र कोलवडी साष्टे पंचक्रोशी दिंडीचे प्रमुख हभप बाळासाहेब गायकवाड, हभप सुरेश रिकामे, विश्वास गायकवाड, प्रकाश गायकवाड, सोपान कदम, सर्जेराव उंदरे, सचिन गायकवाड, बबन गायकवाड, हर्षल गायकवाड वारकरी उपस्थित होते.
स्व. मंगेश (बाबा) पाटील प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यांत आले. यावेळी माजी नगरसेवक शेखर पाटील, दत्तात्रय गोळे, उपप्राचार्य कला विज्ञान महाविद्यालय इंदापूर, जवाहरलाल बोरा, निलेश बोरा, नितीन मस्के, प्रीतम देवकर, सागर बनकर, अभिजीत पाटील, ओमकार शिंदे, विनीत फडतरे, कृष्णांक जगताप, अंकुश दोरकर, निलेश शिंदे, रुद्र पाटील, अवंतिका पाटील उपस्थितीत होते. शिवसेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी भाकरी आमटीचे अन्नदान वारकऱ्यांना केले.





