विना हेल्मेट प्रवास; सोनू सूदवर टीकेचा भडिमार… नेटकऱ्यांनी घेतली शाळा, नेमकं काय घडलं ?

Sonu Sood : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग घेतला होता. ज्यात त्याने हेल्मेट घालून प्रवास करण्याचे आवाहन केले होते. तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भातही त्याने सांगितले होते. सध्या सोशल मीडियावर सोनू सूदचा विना हेल्मेटने बॅाइक चालवतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, स्वतःच नियम मोडत विनाहेल्मेट बाईक चालविल्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे.
सोनू सुदचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील आहे. स्पिटी व्हॅलीमध्ये तो विनाहेल्मेट बाईक चालवताना पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तो विना शर्ट एका बाईक ग्रपबरोबर बाईक चालवाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ राईड विद व्हिक्टर या इंन्स्टाग्राम पेजेने शेअर केला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून सोनू सूदवर टीका केली जात आहे. व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. सोनू सुदवर आता काहीच कारवाई होणार नाही का? कोणतेही कपडे त्याने घातलेले नाही. देवालाच माहित नाही त्याला नेमकं काय दाखवून जायचं आहे, अशा काही कमेंट्स करण्यात आल्या आहेत.
So will @himachalpolice take any action on @SonuSood for riding naked without a helmet in Spiti? No protective gear, no clothes — for god knows what he is trying to promote. Are celebrities above the law?@splahhp #HimachalPradesh
pic.twitter.com/3XUDBYkXqN— Nikhil saini (@iNikhilsaini) May 26, 2025
सेलिब्रिटी हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे, स्वतःला काय समजतात काय माहित? असे सवालही अनेकांनी उपस्थित केले आहेत. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूदचा व्हायरल झालेला व्हिडिओ २०२३ मधला असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.





