Pune-Mumbai Expressway Toll | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जीवनावश्यक वस्तू असलेल्या दूधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ करण्यात आली. एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता टोल दरवाढीचाही फटका बसणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील. येत्या 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, आता मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावरुन प्रवास करताना चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागणार आहे. तसेच इतर श्रेणींतील वाहनांसाठी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार आहे. Pune-Mumbai Expressway Toll | फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार येत्या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. Pune-Mumbai Expressway Toll | हेही वाचा: पृथ्वीवर परतल्यानंतर कशी आहे सुनीता विल्यम्सची तब्येत? ; काय होणार पुढे ? ठळक मुद्द्यांमधून जाणून घ्या