स्वातंत्रदिनी करा टोल फ्री प्रवास; इलेक्ट्रिक वाहनधारकांना सरकारचे मोठं गिफ्ट

Toll-Free Electric Vehicle | स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनधारकांना गिफ्ट मिळणार आहे. सरकारमार्फत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही टोल माफी काही ठराविक मार्गांवरच असणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना राज्यातील बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबईचा अटल सेतू या तीन मोठ्या एक्सप्रेस वे वर टोल फ्री प्रवास करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून या मार्गावरून इलेक्ट्रिक वाहनं टोल न भरता प्रवास करू शकतील.
पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा
सरकारच्या या निर्णयामुळे केवळ सध्याचे ई-वाहनधारकच नाही, तर भविष्यातील खरेदीदारही लाभ घेण्याची शक्यता आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होते, त्यामुळे शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. शिवाय इंधन आयात खर्चातही घट होईल. Toll-Free Electric Vehicle |
इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करावी यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळे या वाहनांवर असलेल्या टॅक्समध्ये ही सरकारने मोठी सूट दिली होती. पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती, त्यातून होणारं प्रदूषण या सर्व गोष्टी पाहता सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत आहेत. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. Toll-Free Electric Vehicle |
हेही वाचा :
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात शहाबाज शरीफची फुशारकी ; भारताविरुद्ध बोलत म्हणाले,”४ दिवसांचे युद्ध…”





