IAS Transfers : महाराष्ट्रातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा यादी

IAS Transfer : महाराष्ट्रीतल वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज मंगळवारी (दि. 24 डिसेंबर) बदल्या करण्यात आल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिले जात आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 21 डिसेंबर) देखील राज्यातील 23 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा 12 वरिष्ठ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत.
1) अनिल डिग्गीकर (IAS:RR:1990) महाव्यवस्थापक, BEST, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2) डॉ.हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
3) डॉ.अनबलगन पी. (IAS:RR:2001) MAHAGENCOचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांची सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4) डॉ. राधाकृष्णन बी. (IAS:RR:2008) मुख्यमंत्र्यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची महागेन्को, मुंबईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5) संजय दैने (IAS:SCS:2012)जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची, वस्त्रोद्योग, नागपूर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
6) राहुल कर्डिले (IAS:RR:2015) जिल्हाधिकारी, वर्धा यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7) वनमथी सी. (IAS:RR:2015) सह आयुक्त, राज्य कर यांची जिल्हाधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8) संजय पवार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9) अवश्यंत पांडा, (IAS:RR:2017) आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांची जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10) विवेक जॉन्सन (IAS:RR:2018) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11) अण्णासाहेब दादू चव्हाण (SCS पदोन्नती) उपायुक्त (महसूल) पुणे विभाग, पुणे यांची महात्मा फुले जीवनदाई आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12) गोपीचंद मुरलीधर कदम (SCS पदोन्नत) यांची स्मार्ट सिटी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



