पुणे – भुसावळ विभागात सुरू असणाऱ्या कामामुळे लांब पल्ल्याच्या विविध रेल्वे रद्द केल्या आहेत. यामध्ये पुण्याहून अमरावती आणि नागपूरकडे रेल्वेचा समावेश आहे.
दिवाळी आणि छटपर्वाच्या निमित्ताने एकीकडे प्रवासी संख्या वाढल्याने रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. तर, दुसरीकडे रेल्वेने भुसावळ विभागातील सुरू असणाऱ्या तांत्रिक कामांमुळे ऑक्टोबरअखेरीस धावणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत. 27 ऑक्टोबर रोजी पुणे-अमरावती एक्स्प्रेस, 28 ऑक्टोबर रोजी अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे -नागपूर एक्स्प्रेस (02041), 29 ऑक्टोबर रोजी नागपूर-पुणे एक्स्प्रेस (02114 आणि 02042), 30 ऑक्टोबर रोजी पुणे-नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.