Pune Maval : पाटण गावात काळरात्र! मुसळधार पावसात घरावर दरड कोसळल्याने संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली
Pune Maval : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ट्वीटद्वारे माहिती

Pune Maval : मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या पाटण गावात एका घरावर भीषण दरड कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलं. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळानं घाला घातला. या तिघांचा शोध सुरू असून एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एकाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील ट्वीट करत माहिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात आज ६ जुलै रोजी पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 6, 2026
दरम्यान, या दुर्घटनेत नंदू तिकोणेंचं घर किल्ल्यावरुन ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. पहाटे 4 वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिकोणेंचं घर पाहिलं, मात्र पुढच्या पाच मिनिटांत स्फोटासारखा आवाज आला अन् तिकोणेंचं घर गायब झालं, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
एका व्यक्तीचा मृतदेह काढला बाहेर
समोर आलेल्या महितीनुसार, आतापर्यंत ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत बिकट असून मुसळधार पाऊस आणि दुर्गम भागामुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबले गेले असण्याची शक्यता असल्याने जवानांकडून काळजीपूर्वक शोधमोहीम राबवली जात आहे.
हेही वाचा:





