प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – पुणे- नगर महामार्गावर रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये कामगार वाहून नेण्यासाठी दुचाकीवर तीन ते पाच कामगार बेकायदेशीररित्या प्रवास करीत आहेत. मात्र, बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उघडणे गरजेचे आहे.पुणे- नगर महामार्गासह रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कंपनीमध्ये ने आण करण्यासाठी संबंध ठेकेदारांकडून कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने संबंधित सुपरवायझर किंवा कामगारच दुचाकीवर तीन ते पाच जण प्रवास करत असतात. मात्र, त्यामुळे या कामगारांना एखाद्या अपघाताला सामोरे जावे लागेल, याची दक्षता घेतली जात नाही. मात्र, सर्व प्रकाराकडे संबंधित ठेकेदार व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने एखादा अपघात घडला तर याला जबाबदार कोण, असा सवाल सर्वसामान्यांतून उमटत आहे.