उडतरे : पाचगणीकडे उडतर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी जीवघेणी ठरते असून सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. शाळा सुटण्याच्या वेळात आज शुक्रवारी अशी कोंडी झाली होती. पाचगणीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रोजच ही वर्दळ पाहायला मिळते. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासन याकडे काणाडोळा करताना पाहायला मिळत आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून यावर उपाययोजना करावी असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. अन्यथा कोणती दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार हा प्रश्न उपस्थित होत आहे.