पौड – मुळशी तालुक्यातील मुख्य असलेला रस्ता पुणे चांदणी चौक ते पौड याठिकाणाहून शनिवार व रविवार नित्याचीच कोंडी होत असताना सुधा अपुरा पोलिस बंदोबस्त मुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आज शनिवार मुळे कोकणात या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची संख्या अधिक वाढत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे भूकुम माताळवाडी ते भूगाव या दरम्यान असलेल्या दहा मिनिटाच्या रस्त्याला एक तास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे. भूगाव गावाजवळ पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे तरी याठिकाणी जास्त पोलिस बंदोबस्त वाढवून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल. याकरिता प्रशासनाने प्रयत्न करावे. अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून वाहतूक सुरळीत करण्यास योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.