Car Price Hike: तुमची आवडती कार महागली; 1 एप्रिलपासून दरवाढ लागू
Updated On:

Car Price Hike – टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने आपल्या काही उत्पादनाच्या दरात वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
कंपनीचा कार्यचालन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. त्यामुळे काही उत्पादनाच्या किमती 1% पर्यंत वाढविण्यात आल्या असून एक एप्रिल पासून त्या अमलात येतील असे कंपनीने म्हटले आहे.
ही कंपनी भारतात बरीच उत्पादने विकते आणि या उत्पादनाच्या किमती सात लाखापासून 52 लाखापर्यंत आहेत. दरम्यान चलन बाजार अस्थिर असल्यामुळे आणि कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे आगामी काही काळामध्ये बर्याच वाहन कंपन्या आपल्या उत्पादनाच्या दरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.


