#Video : महाबळेश्वरच्या धोधो पावसात वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी

Updated On:

पाचगणी (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, महाबळेश्वरात पडणारऱ्या धोधो पावसात देखील निसर्गाचा विलोभनीय नजरा पाहण्याकरीता पर्यटकांची गर्दी वाढली आहे . वाढता पाऊस महाबळेश्वरच्या पर्यटकांना आकर्षित करत आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून वाहणारे नयनरम्य झरे पर्यटकांना आकर्षित करत आहेत .

महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांना सदैव आकर्षित करणारा वेण्णा लेक ओसंडून वाहत आहे. वेण्णा लेकवर पाऊस आणि धुक्याचा पाठशिवनीचा खेळ पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. भरपावसात धुक्याची दुलई येत असताना पर्यटकांना आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरत नसल्याचे चित्र वेण्णालेकवर पाहयला मिळत आहे.

पडणारा धोधो पाऊस, हवेतील थंड गारवा पर्यटकांना वेण्णालेकवर गरमागरम कणसाची चाखायला मिळणारी तिखट चव पर्यटकांना भर पावसात आनंद देत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Mahabaleshwar Traffic: महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी; तासन्तास ट्रॅफिक जॅममध्ये अडकले पर्यटक

2025-12-29 00:45:12

Mahabaleshwar Traffic: महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी; तासन्तास ट्रॅफिक जॅममध्ये अडकले पर्यटक

वेण्णा लेकच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू करा

2023-01-13 07:57:25

वेण्णा लेकच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू करा

Video: महाबळेश्वरमधील 'वेण्णा'लेकवर गव्याची मुक्त सफारी

2022-11-26 19:28:07

Video: महाबळेश्वरमधील 'वेण्णा'लेकवर गव्याची मुक्त सफारी

महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला

2021-06-21 07:19:30

महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला

उन्हाळा वाढतोय? चला महाबळेश्‍वरला

2021-04-05 09:48:29

उन्हाळा वाढतोय? चला महाबळेश्‍वरला