तळेगाव दाभाडे – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणी नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येणार्या हौशी, पर्यटकासाठी मावळ तालुक्यातील सर्वच व्यावसायिक सज्ज झाले आहेत. तर पर्यटकांच्या आवडीनिवडी नुसारच्या नियोजनाच्या तयारीसाठी सर्व व्यावसायिक गुंतले आहेत. तर रिसॉर्टस व हॉटेल्सचे बुकींग फुल्ल झाले आहे.
शनिवार रविवारची जोडून आलेली सुट्टी त्याचबरोबर सरते वर्ष आणि नविन वर्षाचे आगमन साजरे करण्यासाठी पुणे – मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेले पर्यटक यामुळे मावळ तालुक्यातील विविध भागातील पर्यटन स्थळे गदीर्ने गजबजून गेली आहेत. हौशी पर्यटकांच्या प्रचंड गर्दीने व्यावसायिक आनंदले असून पर्यटकांना चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कर्मचारी,आपले कुटुंबिय तसेच अतिरिक्त यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तर पर्यटकांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीची ही जय्यत तयारी ठेवली आहे. याशिवाय सर्वच बाबतीत वाढीवसाठा स्टॉकमध्ये ठेवला आहे.
पर्यटन व्यवसाय करणार्यांनी आपल्या पर्यटन केंद्रावर आकर्षक रोषणाई, सजावटी तसेच नववर्षाच्या रांगोळ्या, स्पिकरवर पर्यटकांच्या आवडी निवडीची गाणी व संगीत वाजविण्याची व्यवस्था तयार ठेवली आहे. तर काही व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी इमर्जन्सी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळे पर्यटक, स्थानिक व्यावसायिक अतिशय उत्साहाने आपआपल्या केंद्रांवर बुकिंग केलेल्या पर्यटकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. काही पर्यटनस्थाळांना तर जत्रेसारखे स्वरूप आले आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये भूशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, बेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर अशी एकापेक्षा एक सरस ठिकाणे मावळ तालुक्यात पर्यटनासाठी पर्यटकांना खुणावत आहेत.
मोठी आर्थिक उलाढाल
मावळ तालुक्यातील पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळ्यात तुलनेत पर्यटकांची संख्या अधिक दिसत आहे. याठिकाणचे रिसॉर्टस्, रेस्टॉरंटस् , हॉटेल्स व ढाब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित जाणार्या कार्यक्रमांबरोबरच खानपानसेवेतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.