वाघोलीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६७ वर !
Updated On:

वाघोली : मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा काही अंशी कमी झाला असून १९ जुलै रोजी दिवसभरामध्ये वाघोलीतील कोरोनारुग्णांमध्ये नव्याने ४ रुग्णांची भर पडली आहे.
दिवसभरात ४ रुग्ण बरे झाले आहेत. वाघोलीत एकूण १६७ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, यापैकी ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ८८ रुग्ण अॅक्टीव आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. मांजरी खुर्द, कोलवडी, केसनंद, आव्हाळवाडी येथे दिवसभरात एकाही नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही.





