Vivek Oberoi post : “अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव…” विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट
Vivek Oberoi post : “सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!”

Vivek Oberoi post : बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय झाला. अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता.
मात्र, सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीच्या निकालात २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने विजयी साकारला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली. या ऐतिहासिक विजयानंतर बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने सुनेत्रा पवार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
विवेक ओबेरॉयची पोस्ट
“सुनेत्रा वहिनी, अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव… त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक बारामतीकरांच्या मनात कायम राहणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्ही जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.
Sonam Kapoor : अखेर दुसऱ्या मुलाचे नाव केले जाहीर; सोनम कपूरची सोशल मीडियावर खास पोस्ट
दादांनी राबवलेले विविध उपक्रम, त्यांचं सामान्य लोकांवर असलेलं प्रेम आणि त्यांची जिद्द यामुळेच ते खरे ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जात होते आणि आज त्यांच्या अर्धांगिनीवर जनतेने दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी तुम्हीच योग्य वारसदार आहात.
तुम्हाला या नव्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्रासाठी हा नक्कीच सुवर्णकाळ ठरेल. कारण, “सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!” असं विवेकने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात होते
या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नव्हता. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २० अपक्ष उमेदवार होते. त्यामध्ये बारामतीतीलच 8 जण तर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश होता.
हेही वाचा :






