राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबीयांच्या हाती Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीनूसार राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहाराचं सर्व नियंत्रण पवार कुटुंबीयांच्या हाती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीवर सुनेत्रा पवार, पार्थ पवार जय पवार यांचीच पकड असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जमा निधीच्या आर्थिक व्यवहाराची सूत्र पवार मायलेकांच्या हाती असल्याचं बोललं जातय. आयोगाला सादर केलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये स्थान दिलं असून जबाबदाऱ्यांचे वाटप पत्राद्वारे केलंय. पार्थ पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलं आहे. तर कामाची जबाबदारी वाटप करत असताना पार्थ पवार यांना पक्ष समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जय पवार यांना राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन खजिनदाराची जबाबदारीसुद्धा ते पार पाडणार आहेत. त्यांच्यासोबत शिवाजीराव गर्जे यांना खजिनदारपद हे कायम ठेवला आहे त्यांच्याकडे लेखापरीक्षण आणि हिशोबाचे काम देण्यात आले आहे. या सगळ्या जबाबदाऱ्याच वाटप 29 एप्रिलच्या यादीनुसार पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण अधिकार पवार कुटुंबियांच्या हाती असणार असं या यादीकडे पाहून दिसतंय. NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यापर्यंत पेपरफुटीचे धागेदोरे पोहचले आहेत. २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटीचं रॅकेट महाराष्ट्रात सक्रीय असल्याचं उघड झालंय. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यातही याचे धागेदोरे समोर आले आहेत. पेपरफुटीच्या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनारच्या चौकशीनंतर आता अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडेंला सीबीआयनं राहुरीतून ताब्यात घेतलयं. तर दुसरीकडे या प्रकरणात पुण्यातल्या मनिषा वाघमारे या महिलेचं नाव समोर आलं असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिच्या चौकशीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या सीकरमध्ये मंगिलाल बिवल आणि दिनेश बिवल या दोन भावांना पोलिसांनी अटक केलीय.दरम्यान , लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या पेपरमाफियांची पाळंमुळं सीबीआयनं खणून काढणं गरजेचं आहे. रुग्णालयात ‘टायमर बॉम्ब’ ठेवताना आरोपी सीसीटीव्हीत कैद पुण्यातील हडपसरच्या ‘उषाकिरण’ रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश वस्तू सापडल्याच्या घटनेला आता वेगळं वळण मिळालंय. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित आरोपी ओला इलेक्ट्रिक गाडीवरून आल्याचे आणि त्यानेच ही वस्तू ठेवल्याचे समोर आलंय. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून तपास यंत्रणांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत.या फुटेजच्या आधारे पोलीस आता त्या गाडीचा नंबर आणि आरोपीचा माग काढत आहेत. आरोपी बॉम्बसदृश वस्तू ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या विरोधात विशेष तपास पथकाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या एकूण गुन्हा पैकी 9 गुन्ह्याचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे, त्यातील महिला अत्याचार प्रकरणातील दोन गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल झाले आहे, एका गुन्ह्यात 750 आणि दुसऱ्या गुन्ह्यात साधारणपणे 450 जवळपास 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल झाले आहे, उर्वरित गुन्ह्याचे दोषरोप पत्र लवकरच दाखल केले जाणार आहे. सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जाबजबाब नोंदनविण्यात आले आहे, खरातच्या घरी, कार्यलयात, फार्म हाऊसवर छापा मारून अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहे, इलेक्ट्रॉनिक, पुरावे,कागदपत्रे यासह इतर पुराव्याचा यात सहभाग आहे. साक्षीदारांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती Top 10 News : भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय . नैऋत्य मान्सूनच्या आगेकूचसाठी पोषक वातावरण तयार होत असून 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेट समूह याठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. यामुळे यंदाच्या मान्सूनची अधिकृत सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता असून, देशभरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागलं. भारतीय हवामान विभागाने 13 मे रोजी जारी केलेल्या निवेदनात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यंने मान्सूनच्या आगेकूचला गती मिळत आहे. मान्सूनच्या हालचालीसाठी समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाब यांसारखे घटक सध्या अनुकूल असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.मान्सूनच्या हालचालीबरोबरच उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आठवडाभर अनेक भागांमध्ये उष्णतेची परिस्थिती गंभीर राहू शकते. आता साखरेच्या निर्यातीवर तत्काळ बंदी ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तत्काळ बंदी घातलीय. हा निर्णय आजपासूनच लागू झाला असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही निर्यातबंदी कायम राहणार आहे. देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होऊन साखरेचे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने हे पाऊल उचललय. साखरेचा समावेश आता ‘निर्बंधात्मक’ श्रेणीतून काढून ‘प्रतिबंधित’ श्रेणीत करण्यात आलाय. अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांना विशेष कोठ्यांतर्गत होणारी साखर निर्यात सुरू राहणार आहे. ज्या साखरेची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे किंवा जी साखर ‘एक्सपोर्ट पाईपलाईन’ मध्ये आहे, त्या निर्यातीवर कोणतीही बंदी नसेल. दोन देशांच्या सरकारांमध्ये होणाऱ्या करारांनुसार होणारी निर्यात सुरू राहू शकते. AIDMK च्या २५ आमदारांची पक्षातून हकालपट्टी थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं एकतर्फी विजय मिळवत तामिळनाडूमध्ये सत्तास्थापन केली. बुधवारी विजय यांनी बहुमतही सिद्ध केले. पण त्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. AIDMK नं आपल्या २५ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान या आमदारांनी पक्षाचा ‘व्हीप’ झुगारून सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.या बंडखोरीनंतर सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी कडक पावले उचललीत. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये एस.पी. वेलुमणी आणि सी.व्ही. षण्मुगम यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे. पक्षानं आता या आमदारांविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची मागणी केलीय. फिलीपिन्सच्या संसदेवर गोळीबार ; खोल्यांमध्ये लपलेले खासदार फिलीपिन्सची राजधानी मनिलामधून एक धक्कादायक बातमी समोर येतीय. बुधवारी सिनेट इमारतीत अचानक गोळीबार झाल्याने सर्वत्र घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या परिसरात १२ हून अधिक गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला, ज्यामुळे खासदार आणि कर्मचारी सुरक्षित खोल्यांमध्ये पळून गेले. ही घटना सिनेटर रोनाल्ड देला रोसा यांना अटक करण्याच्या प्रयत्नांशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. समोर आलेली माहितीनुसार, रोनाल्ड डेला रोसा अटक टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सिनेट संकुलात लपून बसले होते. सिनेट नेतृत्वाने त्यांना ‘संरक्षणात्मक कोठडी’त ठेवले आहे, ज्यामुळे तपास यंत्रणा आणि संसदेच्या सुरक्षा पथकामध्ये तणाव वाढला आहे. गोळीबार कोणी केला आणि त्यात कोणी जीवितहानी झाली आहे का, हे सध्या अस्पष्ट आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे. मनीष पांडेचा झेल पाहून संपूर्ण स्टेडियम आवक आयपीएल 2026 च्या हंगामात काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 विकेट्सने विजय मिळवला. शतक झळकवणाऱ्या आरसीबीच्या विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दरम्यान, आरसीबी आणि कोलकाताच्या सामन्यात मनीष पांडे (घेतलेल्या झेलने सर्वांचं लक्ष वेधलं. आरसीबीचा या सामन्यात विजय झाला असला तरी केकेआरचा फिल्डर मनीष पांडे याने आयपीएलच्या इतिहासातला सर्वोत्तम झेल पकडला. केकेआरचा फास्ट बॉलर कार्तिक त्यागीने टीम डेव्हिडला ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल टाकला, ज्यावर टीम डेव्हिडने कट मारला पण पॉईंटवर उभ्या असलेल्या मनीष पांडेने झेप घेत भन्नाट झेल पकडला. मनीष पांडेचा हा झेल पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच सन्नाटा पसरला तर कार्तिक त्यागी याचाही या झेलवर विश्वास बसला नाही. स्वत: टीम डेव्हिडही हा झेल पाहून अवाक झाला. विशेष म्हणजे विरोधी टीमचा असूनही विराट कोहली मनीष पांडेच्या जवळ जाऊन त्याच्या या झेलचं कौतुक करतान दिसला. आता तरी तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात कराल? Top 10 News : बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. अभिनेत्री सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असते. नीट पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यानं कोटा येथील विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. अभिनेत्री कुनिकानं याबद्दल एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, “कसे आहात मित्रांनो? NEET परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे, आता तरी तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात कराल? की तसेच अंध-भक्त बनून राहाल? माझ्या आयुष्याबद्दल गुगल करणं थांबवा… त्याऐवजी, मागील पेपरफुटीमागील गुन्हेगार सध्या कुठे आहेत आणि कोणत्या ‘मलाई पोस्टिंग’चा सध्या उपभोग घेत आहेत, याचा शोध घ्या…” तिच्या या पोस्टवर युझर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत