Legislative Session: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आजचा अधिवेशनाचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज विधानपरिषदेच्या नऊ आमदारांना निरोप दिला जाणार आहे. नऊ आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यात संपणार असून, त्यांच्यासाठी आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील अधिवेशनाअगोदर नऊ विधानपरिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने आजच त्यांना अधिकृत निरोप दिला जाणार आहे. विधानपरिषद सभागृहात त्यांना निरोप दिला जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे नाव आहे ते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे. त्यांच्यासह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी या सदस्यांना कार्यकाळ संपत आहे. हेही वाचा : World TB Day: एकत्र या, टीबी हरवूया! टीबीविरुद्ध लढ्याचा निर्धार; जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्त्व दरम्यान, भाजपचे सर्वाधिक चार आमदार विधानपरिषदेतून निवृत्त होणार आहेत. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, रणजितसिंह मोहिते या आमदारांचा यामध्ये समावेश आहे. हे सर्व सदस्य 14 मे 2020 रोजी निवडून आले होते. (काही निवडणुकीतनंतर) या 9 जागांसाठी निवडणूक ही विधानसभेतील आमदारांच्या मतदानाने होईल. महायुती (भाजप + सहयोगी) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यात चुरस अपेक्षित आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. याचे कारण विधानसभेतील त्यांचे संख्याबळ मर्यादित आहे. Legislative Session Legislative Session : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह 9 आमदारांचा विधानपरिषदेतील आज शेवटचा दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्याने ते निवृत्त होणार आहेत. आज सभागृहात त्यांना देखील निरोप दिला जाणार आहे. त्यांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. Legislative Session हेही वाचा : Flights fare: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांची भाडेवाढ ; १ एप्रिलपासून लागू होणार नवे दर?