Election 2026: पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात आज, गुरुवारी १५२ जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील १६ जिल्ह्यांत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. बंगालमध्ये जिथे ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तिथे तामिळनाडूमध्ये एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके (DMK) आपले सरकार टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Election 2026) दरम्यान, निवडणूक आयोगाने सकाळी ९ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. बंगालमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १८.७६ टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात सर्वाधिक २०.५१% मतदान झाले, तर मालदा जिल्ह्यात सर्वात कमी (१६.९६%) मतदान झाले आहे. तर दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये हा आकडा १७.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. (Election 2026) Election 2026: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी किती? पश्चिम बंगालमधील चर्चेत सीट चर्चित जागांपैकी नंदीग्राममध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान होत आहे. गेल्या वर्षी नंदीग्राम ही सर्वात महत्त्वाची जागा ठरली होती, कारण २०२१ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेंदु अधिकारी यांच्यात येथे थेट लढत झाली होती. यावेळीही या दोघांमध्ये सामना होत आहे, मात्र तो भवानीपूरमध्ये. शुभेंदु अधिकारी हे नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवरून निवडणूक लढवत आहेत. त्याचप्रमाणे, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (बहरामपूर), भाजप नेते दिलीप घोष (खडगपूर सदर) आणि ‘आम जनता उन्नयन पार्टी’चे नेते हुमायूं कबीर (दोमकल) यांचे भवितव्यही पहिल्याच टप्प्यात ठरणार आहे. तामिळनाडूमधील चर्चेत सीट तामिळनाडूमध्ये एकूण २३४ विधानसभा जागा आहेत. त्यापैकी कोलाथुर (एम. के. स्टालिन), डॉ. राधाकृष्णन नगर, मदुरवोयल आणि अंबत्तूर या प्रमुख जागा आहेत. या जागा चेन्नईच्या शहरी भागांचे आणि महत्त्वाच्या राजकीय बालेकिल्ल्यांचे प्रतिनिधित्व करतात. येथील मुख्य राजकीय लढत प्रामुख्याने द्रविड मुन्नेत्र कझगम (DMK) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (AIADMK) यांच्यात आहे. हेही वाचा: Baramati and Rahuri : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; कोणाचं पारडं जड?