Supriya Sule : साताऱ्यातील जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी झालेल्या राड्याची राज्यभरात चर्चा आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी गंभीर आरोप करत साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली असल्याचा आरोपा त्यांनी केला आहे. झटापटीत त्यांच्या बोटाला जखमी झाली. या घटनेवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. Supriya Sule सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत साताऱ्याच्या घटनेवर भाष्य करताना निषेध नोंदवला. शंभुराज देसाई काल विधीमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते, मला या गोष्टीवर विश्वासच बसत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी हे दुर्देव आहे, जी काही साताऱ्याची घटना झाली. ती लोकशाहीची हत्या आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. कोणाच्याही मनमर्जीने हा देश चालणार नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार असल्याचे देखील सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या. हेही वाचा : TV Remote: रिमोट थपथपल्यावर का चालतो? जाणून घ्या ‘जुगाड’मागचं विज्ञान! या प्रकरणात साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकांच्या निलंबणाची मागणी करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर बोलाताना सुप्रिया सुळे यांनी हा पोलिसांचा संबंध नाही. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदूश्यशक्तीचा ताकद आहे. हे पोलिसांना करायला लावले नाही तर महाराष्ट्रातील पोलिस असे करणारच नाहीत, असा माझा विश्वास असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. चौकशीची मागणी Supriya Sule पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पत्र लिहिणार आहे. काल मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत चर्चा केली. कारण दिल्लीतील वर्मतमान पत्रांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. आज हा साताऱ्याचा विषय आहे. उद्या परत 10 ठिकाणी होईल, मुळात म्हणजे असे करणेच चुकीचे आहे. मी शंभूराजेंनाही फोन करणार आहे आणि मी मकरंद पाटलांना फोन करून अगोदरच सर्व माहिती घेतली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हेही वाचा: Middle East Conflict : होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा: म्हणाले ,”मी आणि अयातुल्ला मिळून त्यावर…”