Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात पाऊल ठेवले. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून त्या आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. Sunetra Pawar “अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. पण सुनेत्रा पवार यांना जर भाजपा मुख्यमंत्री करणार असतील, तर तो भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवारांना राजकीय वारसदार बनवून जातात की काय? असं मला यांच्या बोलण्यातून दिसते,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. Sunetra Pawar यावेळी संजय राऊत यांनी शरद पवारांचा उल्लेख करत म्हंटले, “शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? मोदी आणि शाह यांनी कुणालाही पदे दिली असतील, पण शरद पवार यांनी जर बारामती उभी केली नसती, तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कुठलंच स्थान मिळालं नसतं. त्यामुळे माणसाने किमान कृतज्ञता ठेवायलाच हवी. Sunetra Pawar Sunetra Pawar : अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही, पण सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार असतील, तर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचे विधान “बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव निर्माण करून दिला, त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. तसेच बारामती म्हणजे शरद पवार…. सुनेत्रा पवार असोत किंवा इतर कोणीही पवार असो, तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही राजकारणात ‘पवार’ म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे उभे आहात, याचा विसर पडता कामा नये,” असेही राऊत म्हणाले. सध्याची निवडणूक हा पवार कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. पण तरीही पवारांमुळे आपण आहोत हे इतरांनी लक्षात ठेवायला हवे. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केलात तरीही तुमच्या पाठीशी पवारांची पुण्याई आहे. ही निवडणूक अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून मविआ लढवत नाही. पण पुढली निवडणूक बिनविरोध नसेल,” असेही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री? हेही वाचा: Asha Bhosle: आशा भोसले-ओ. पी. नय्यर यांची गाजलेली जोडी; लता मंगेशकरांना डावलत घडवली हिट गाण्यांची मालिका