Rohit Pawar: “पेपरफुटी, इंधन तुटवडा, महागाई, महिला अत्याचार सर्वत्र विचित्र परिस्थिती…”; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Rohit Pawar: 'ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामं खोळंबली'

Rohit Pawar: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी वाढत असतानाच काही पेट्रोल पंपांवर इंधन मिळत नसल्याच्या आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याबाबतचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नुकतेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मुबलक इंधन पुरवठ्याबाबत भाष्य केले आहे. “डिझेल-पेट्रोलचा वरूनच पुरवठा होत नसल्याने पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, परिणामी ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामं खोळंबली आहेत. जळगाव जिल्ह्यात पूर्णतः इंधन साठा संपल्याने पंपांवर रात्रीपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत. Rohit Pawar
संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती आहे, परंतु राज्य सरकारला अद्यापही जाग येताना दिसत नाही. पेपरफुटी, इंधन तुटवडा, महागाई, महिला अत्याचार अशी सर्वत्र विचित्र परिस्थिती असून काहीही आलबेल नाही. केंद्र तसेच राज्य सरकारची असंवेदनशीलता बघता ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरो’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही,” असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारला टोला लगावला आहे.
डिझेल-पेट्रोलचा वरूनच पुरवठा होत नसल्याने पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, परिणामी ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामं खोळंबली आहेत. जळगाव जिल्ह्यात पूर्णतः इंधन साठा संपल्याने पंपांवर रात्रीपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत.
संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती आहे, परंतु…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
दरम्यान, राज्यात काही भागांत निर्माण झालेल्या इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सध्या शेतीचा हंगाम तोंडावर असल्याने डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालावे.
कोणत्याही स्तरावर इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही, यावर प्रशासनाने बारीक लक्ष ठेवावे. जर कोण साठेबाजी करीत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. Rohit Pawar
छगन भुजबळांचे आवाहन
तर इंधन टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असून, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पॅनिक होऊन लोकांकडून गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
हेही वाचा:





