\n\nA phenomenal knock comes to an end 👏
\nIshan Kishan heads back after scoring 91 off 44 balls 👌
\nUpdates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/vSW3p8m1pr
\n— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
\nइशानने अवघ्या ३० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ९१ धावांची धडाकेबाज खेळी करत हैदराबादला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याने हेनरिक क्लासेनसोबत (४० धावा) तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेरीस नितीश रेड्डी आणि सलिल अरोरा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादने ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला.
\n\nFor his match-winning spell on his #TATAIPL debut, Praful Hinge is named the Player of the Match 🏅
\nRelive his performance ▶️ https://t.co/0krCOcyK55 #KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/rRonwHbuxy
\n— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
\nप्रत्युत्तरात २१८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची भंबेरी उडाली. हैदराबादचा नवा शोध ठरलेल्या पदार्पणवीर प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने एकाच षटकात तीन बळी घेत इतिहास रचला. राजस्थानचे दिग्गज फलंदाज प्रफुल्लच्या जादुई स्पेलसमोर हतबल दिसले आणि संपूर्ण संघ ५७ धावा आधीच गारद झाला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत आपली स्थिती सुधारली असून राजस्थानला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे.