Ashok Kharat Case : महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या नराधम कॅप्टन अशोक खरातची काल सोमवारी तब्बल 10 कसून चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः अशोक खरातची चौकशी केली असून, या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची क्राईम ब्रांचने तपासणी केली. यामध्ये याच कार्यालयात महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महिलांना भोंदू अशोक खरात कशा प्रकारे जाळ्यात ओढायचा याचा सखोल तपास केला जात असून, त्या दृष्टीने पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिसांकडून अशोक खरातचे कार्यालय तसेच इतर कागदपत्रं तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती आहे. हेही वाचा : Colombian military plane crash: 110 सैनिकांना घेऊन जाणारे कोलंबियन लष्करी विमान उड्डाणादरम्यान कोसळले पोलिसांनी केलेल्या तपासात बुवाबाजी करत खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्यांचे लैंगिक शोषण केले. यासाठी त्याने रबराचा नकली नाग आणि वाघाचं कातडं दाखवून महिलांच्या मनात भीती निर्माण केली. अशी धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. खरात अघोरी पूजा तंत्रमंत्रचा अवलंब करायचा. नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. साधं चिंचोका हे एखादं रत्न असल्याच्या भूलथापा मारत खरातनने एक लाखांना विकल्यांची हादरुन सोडणारी माहिती त्याच्या निकटवर्तीयाने केलेल्या तक्रारीतून समोर आली आहे. खरातवर आणखी तीन गुन्ह्यांची नोंद भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोंदू खरातवर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले आहेत. खरातविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पोलीस चौकशीत त्याच्याकडून इतर गुन्ह्यांचेही जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती आहे. 17 मार्च या दिवशी नाशिक पोलिसांनी भोंदू अशोक खरातला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करण्यात आला. त्याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची पोलीस कोठडी आज संपणार असून, त्याला आज दुपारी 2 वाजता नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय घडते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Drishyam3: ‘दृश्यम ३’ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता मोहनलालच्या वाढदिवशी होणार मोठा धमाका