Anjali Damania : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून शिर्डी पोलिसांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सख्खी बहिण प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची तब्बल आठ तास चौकशी केली. या घडामोडींमुळे रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना प्रतिभा चाकणकर यांनी समता पतसंस्थेत आपले कोणतेही खाते नसल्याचा दावा केला. तसेच त्या कधीही त्या संस्थेत गेल्या नसून त्यांच्या नावाचा वापर बनावट कागदपत्रांमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्ताही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. अंजली दमानियांचा दावा काय? दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत वरिष्ठ पोलिस अधिकारी दत्ता कराळे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून भाषण का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कराळे यांनी खरातला 18 कॉल केल्याचा दावा केला असून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.( Anjali Damania) Anjali Damania : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे खरातला 18 कॅाल; दमानियांचा मोठा दावा, जुना व्हिडिओ केला शेअर दमानिया यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशीही मागणी केली आहे. श्री दत्ता कराळे हे एक IG लेवल चे पोलिस अधिकारी असतांना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले ? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार ? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे त्यांचे देखील थोडे थोडके… pic.twitter.com/FWq0dHHpdT — Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 13, 2026 दरम्यान, पोलिस तपासात समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चार खाती असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन खाती स्वतः प्रतिभा यांच्या नावावर, तर दोन त्यांच्या मुलांच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे. या खात्यांमधून दोन कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. Raj Thackeray या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील सक्रिय झाले असून नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. हेही वाचा : SRH vs RR : हैदराबादने राजस्थानच्या विजयरथाला लावला ब्रेक! विदर्भाचा प्रफुल्ल हिंगे ठरला विजयाचा शिल्पकार