Rupali Chakankar : नाशिक येथील भोंदूबाबा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज एसआयटीकडून तब्बल सहा तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पूजा-विधी आणि संस्थांशी संबंधित विविध मुद्द्यांवर तपास पथकाने प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती समोर आली आहे. (Rupali Chakankar) यापूर्वी एसआयटीने चाकणकर यांना नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा केला होता. अखेर आज त्या चौकशीसाठी हजर झाल्या. (Rupali Chakankar) चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर यांनी, पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी पूर्ण सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणांसमोर सविस्तरपणे माझी बाजू मांडली आहे. चौकशीबाबतचा तपशील पुढे समोर येईल. मी आता पुण्याला निघाले आहे, असे सांगत अधिक भाष्य टाळले. (Rupali Chakankar) सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीने त्यांना अशोक खरातसोबतचे संबंध, शिवनिका संस्थेतील कामकाज, पूजा-विधींचे स्वरूप, आर्थिक व्यवहार तसेच खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ याबाबत प्रश्न विचारले. अशोक खरातसोबत केव्हापासून संबंध होते?, पूजा-विधींमधून आर्थिक संबंध जोडले गेले होते का?, संस्थांच्या बैठकीत नेमके काय कामकाज चालत होते? अशा प्रश्नांवर सविस्तर चौकशी करण्यात आली. (Rupali Chakankar) दरम्यान, एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तासांहून अधिक वेळ थेट चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या मंदिरात येणाऱ्या राजकीय व्यक्तींबाबत तसेच संबंधित आर्थिक व्यवहार कोणत्या बँक खात्यांतून झाले, याचाही तपास सुरू असल्याचे समजते. (Rupali Chakankar) या प्रकरणात यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचीही चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Rupali Chakankar)