Love and War : रणबीरच्या नव्या अवताराने वेधले लक्ष; ‘लव्ह अॅन्ड वॅार’मधील दमदार फर्स्ट लूक समोर
Love and War : रणबीर कपूर एका गाडीमध्ये ड्रायव्हिंग करताना दिसत आहे. त्याचा एक हात गाडीच्या दरवाजावर असून, हाताला जखम झाल्याचे पोस्टरमध्ये दिसते.

First poster of the movie ‘Love and War’ released : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू असून, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या तगड्या त्रिकुटामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आता निर्मात्यांनी सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले असून, त्यामध्ये रणबीर कपूरची झलक पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर एका गाडीमध्ये ड्रायव्हिंग करताना दिसत आहे. त्याचा एक हात गाडीच्या दरवाजावर असून, हाताला जखम झाल्याचे पोस्टरमध्ये दिसते. रणबीरचा हा लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
‘प्रेमात घायाळ झालेला रणबीर’ अशा स्वरूपाच्या कमेंट्सही नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. रणबीर कपूरने यापूर्वी दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे ‘लव्ह अँड वॉर’मध्ये त्याची नेमकी भूमिका काय असणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, फर्स्ट लूकसोबत निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही जाहीर केली आहे. ‘तो दर्जा, ती आभा, ती उत्कटता!’ असे कॅप्शन देत ‘लव्ह अँड वॉर’ २१ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.
भव्यदिव्य मांडणी आणि संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनामुळे या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमाची कथा प्रामुख्याने युद्ध आणि देशावरील निष्ठा यांच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा एक त्रिकोणी प्रेमसंबंधावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
Satyashodhak Samaj: ‘नकोच त्याला मध्यस्थी’! १५३ वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी दाखवली सत्याची वाट





