Ranbir Kapoor: रणबीर कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर… ‘ती’ एक चूक होताच मागावी लागली माफी
Ranbir Kapoor : 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकाताला येथे गेला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून, ज्यात त्याने चुकीचे विधान केले आहे. यावरून त्याला सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
दसऱ्यानिमित्त कोलकत्तामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना रणबीरकडून झालेल्या एका चुकीमुळे पूर्णपणे वेगळाच संदेश पोहोचला. व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, “दसरा आपल्याला एका सुंदर सत्याची आठवण करून देतो. वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली, तरी शेवटी अंत सत्याचा आणि चांगुलपणाचाच होतो,” असे म्हणताना दिसतो.
रणबीर कपूरचे हे बोलणे ऐकताच त्याच्या मागे बसलेले लोक टाळ्या वाजवू लागतात. मात्र, काहींच्या चेहऱ्यावर गोंधळाचे भाव दिसतात. सध्या त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. “तू कसला राम बनणार?” “जो माणूस स्क्रिप्ट वाचून बोलत असतो, तो अशाच गोष्टी बोलणार” असे म्हणत त्याला ट्रोल करण्यात आले.
View this post on Instagram
रणबीर कपूरने मागितली माफी
दरम्यान, रणबीर कपूरने याप्रकरणी आता माफी मागितली आहे. 21 ऑक्टोबर रोजी, रणबीर कपूर त्याच्या ‘रामायण: भाग 1’ या पौराणिक चित्रपटाच्या संपूर्ण अल्बमच्या लाँचसाठी चेन्नईला गेला होता. या कार्यक्रमादरम्यान, दसऱ्याच्या दिवशी त्याने भाषणात जी चूक केली त्याबद्दल माफी मागितली.
तो म्हणाला, “काल दसऱ्याच्या कार्यक्रमात जे घडले, त्याबद्दल मी माफी मागू इच्छितो. माझ्याकडून शब्द चुकून निघाले होते. मला असे म्हणायचे होते की, ‘वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली, तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो.’
पुढे अभिनेता म्हणाला, “यामुळे मला ‘रॉकस्टार’च्या वेळी ए.आर. रहमान सरांसोबत काम केल्याची आठवण येते. मी पुन्हा एकदा तेच म्हणेन मला जे काही व्यक्त करायचे असते, ते शब्दांत मांडताना बिघडून जातं. म्हणूनच मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो.”
‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात रिलीज होईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये येईल.
हेही वाचा:





