Rajya sabha elections: राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; १० राज्यांमधील २४ रिक्त जागा भरल्या जाणार
Rajya sabha elections: भारतीय निवडणूक आयोगाने द्विवार्षिक राज्यसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Rajya sabha elections: भारतीय निवडणूक आयोगाने द्विवार्षिक राज्यसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जून २०२६ मध्ये १० राज्यांमधील चोवीस जागा रिक्त होणार आहेत, तर इतर राज्यांमधील दोन जागा आधीच रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने आज जारी केलेल्या अधिसूचनेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि झारखंडमधील बावीस खासदार १ जून रोजी निवृत्त होत आहेत.
तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, वरील राज्यांमधील विद्यमान खासदारांचा कार्यकाळ २१ जून ते १९ जुलै या वेगवेगळ्या तारखांना संपत आहे.
किती जागा रिक्त होतील आणि निवडणुका अशाप्रकारे घेतल्या जाणर (Rajya sabha elections)
आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी चार जागा रिक्त होतील. मध्य प्रदेश आणि राजस्थानचे खासदार प्रत्येकी तीन जागांसह, तर झारखंडचे खासदार दोन जागांसह निवृत्त होतील. मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणुका होतील. निवृत्त होणाऱ्या खासदारांपैकी ११ भाजपचे, तर ४ काँग्रेसचे आहेत. उर्वरित ९ इतर पक्षांचे आहेत.
EC announces Schedule for #RajyaSabha Elections to 24 Seats. #Elections2026 #ECI
▪️Former Prime Minister H. D. Devegowda and Union Ministers George Kurian and Ravneet Singh are among the Members who are completing their terms next month. pic.twitter.com/rUuCzbeS2W
— All India Radio News (@airnewsalerts) May 22, 2026
अधिसूचनेनुसार, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. ९ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. ११ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. मतमोजणी देखील १८ जून रोजीच होईल आणि राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया २० जूनपर्यंत पूर्ण होईल. (Rajya sabha elections)
हे 24 खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार (Rajya sabha elections)
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. अयोध्या रामी रेड्डी अल्ला, नाथवानी परिमल, पिल्लई सुभाष चंद्र बोस आणि सना सतीश बाबू हे २१ जून रोजी आंध्र प्रदेशातून निवृत्त होत आहेत.
रामभाई हरजीभाई मोकारिया, अमीन नरहरी हिराभाई, गोहिल शक्तीसिंहजी हरिचंद्रसिंहजी आणि रमिला बेचरभाई बारा गुजरातमधून निवृत्त होत आहेत. दीपक प्रकाश आणि शिबू सोरेन झारखंडमधून निवृत्त होत आहेत. (Rajya sabha elections)
जॉन कुरियन, दिग्विजय सिंग आणि सुमेरसिंग सोलंकी हे मध्य प्रदेशातून निवृत्त होत आहेत. मणिपूरचे महाराजा सनजाओबा लेशेंबा आणि मेघालयातील वानवेइरोई खार्लुक्की 21 जून रोजी निवृत्त होत आहेत.
अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया 23 जून रोजी निवृत्त होत आहेत आणि मिझोराममधील के. वनलावेना 19 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. राजस्थानमधील नीरज डांगी, राजेंद्र गेहलोत आणि रवनीत सिंग बिट्टू 21 जून रोजी निवृत्त होत आहेत. नारायण कोरगप्पा, इराण्णा काडाडी, एचडी कर्नाटा गोवदाकर आणि के.





