Petrol-Diesel Price Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. या भडक्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. देशात आता पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. गेल्या काही दिवसांपासून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर, तेल कंपन्यांनी आजपासूनइंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली. आज सकाळी 6 वाजल्यापासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol-Diesel Price Hike) दिल्लीमध्ये, नियमित पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटरवरून वाढून 97.77 रुपये झाला आहे. डिझेलचा दर 87.67 रुपये प्रति लिटरवरून वाढून 90.67 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे; ज्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किमतींमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या या दरांमध्ये आज लक्षणीय बदल झाला आहे. Petrol-Diesel Price Hike: देशभरात इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात भरघोस वाढ ; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री मागच्या ७० -७५ दिवसापासून रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष उफाळून आला असूनही, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये वाढ करणे दीर्घकाळापर्यंत टाळले होते; तथापि, तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अखेर इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींचे इंधन बचतीचे आवाहन (Petrol-Diesel Price Hike) गेल्या रविवारी, सध्याच्या संकटाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये इंधनाचा काटकसरीने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास स्थगित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून, सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 95 च्या पातळीच्या खाली घसरले आहे. महागाईचा विस्फोट (Petrol-Diesel Price Hike) देशात महागाईचा दबाव आता अत्यंत वेगाने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर (WPI) वाढून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88 टक्के इतका होता. अवघ्या महिनाभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षांचा विक्रम मोडणारी ठरली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाईमागचे मुख्य कारण मानले जात आहे. या महागाईच्या वाढीमध्ये ‘फ्यूल आणि पॉवर’ क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहिले आहे. मार्चमध्ये केवळ 1.05 टक्क्यांवर असलेली या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये थेट 24.71 टक्क्यांवर झेपावली आहे.