Operation Tiger: ऑपरेशन टायगर Sucessfull…! ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
Operation Tiger: शिंदे पक्षात विलीनकरणाचा मार्ग मोकळा

Operation Tiger: ठाकरे सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे गटाला शिंदे पक्षात विलीनकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार आपली भूमिका मांडणार आहेत.
यात ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.
हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यांच्या सह्यांचा पत्र गट स्थापननेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आले आहे, त्यानंतर आता गट स्थापन झाल्याची माहिती मिळते आहे, यानंतर आता सहा जणांचा गट शिवसेनेत विलीन होणार आहे.
एकीकडे उद्धव सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला मंजूरी दिल्यानंतर, दुसरीकडे खासदार संजय राऊत हे तातडीने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या भेटीला पोहचले आहेत. या गटाला मंजूरी देण्यापूर्वी उद्धव सेनेची बाजू ऐकून घेण्यासाठीची विनंती ते करणार असल्याची माहिती आहे.
काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार दिल्लीत दाखल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. (Operation Tiger)
अधिकृत मंजुरी (Operation Tiger)
पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
तर उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने चार पानी पत्र पाठवले होते. त्यात असा कोणताही स्वतंत्र गट स्थापन्यापूर्वी, विलिनीकरणापूर्वी उद्धव सेनेची भूमिका ग्राह्य धरण्याची विनंती करण्यात आली होती.
पक्षप्रवेश 19 तारखेला?
या खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश हा आता 19 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. जेव्हा शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन सोहळा होतोय. नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा सोहळा पार पडणार आहेत. त्याच सोहळ्यामध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनासह हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
हेही वाचा:






