Nitin Gadkari : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन केले. मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करणार आहेत, तसेच आपल्या ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाद्वारे त्यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याबाबत महत्त्वाची अपडेट दिले आहेत. त्यांनी त्यांचा हा महाराष्ट्र दौरा बसने करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पालखी मार्गाची पाहणी करताना ते बसने प्रवास करणार असल्याची माहिती आहे. (Nitin Gadkari) Sant Dnyaneshwar Palkhi Sohala गडकरी आज 14 आणि उद्या 15 मे 2026 रोजी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग प्रकल्पांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा या दौऱ्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. Nitin Gadkari पालखी महामार्ग प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री गडकरीच रस्त्यावर उतरणार (Nitin Gadkari) आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच आता पालखी महामार्ग प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मंत्री गडकरीच रस्त्यावर उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. गडकरी यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक सुविधांचा विचार करून घेतलेला हा निर्णय इतर नेत्यांसाठीही आदर्श ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे या दौऱ्यात केवळ मंत्रीच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण सुरक्षा कर्मचारी, मंत्रालयाचा स्टाफ आणि निमंत्रित पत्रकार देखील एकाच बसमधून प्रवास करणार आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच पालखी मार्गाची पाहणी करताना सर्व सुरक्षा रक्षकांसोबत आपल्या लाल परीने म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसनेही ते प्रवास करणार असल्याबाबत नितीन गडकरींनी नमूद केले आहे. Nitin Gadkari हेही वाचा: uttar pradesh storm: उत्तर प्रदेशात वादळाने हाहाकार ; ५४ जणांचा मृत्यू, १६ प्राण्यांचा बळी