Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी या प्रकरणात राज्य सरकारमधील चार बड्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Ashok Kharat Case) अशोक खरात याच्या अटकेनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. या प्रकरणाचा सखोल तपास झाला, तर मंत्रिमंडळातील चार मंत्री अडचणीत येतील, असा दावा त्यांनी केला. तसेच संबंधित मंत्र्यांची नावे लवकरच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असल्याचेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. (Ashok Kharat Case) यावेळी बोलताना नाना पटोले यांनी अत्यंत धक्कादायक दावा केला. ज्याप्रमाणे जेफ्री एपस्टीनचा मृत्यू झाला, त्याचप्रमाणे अशोक खरातलाही माहिती बाहेर येऊ नये म्हणून मारले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. (Ashok Kharat Case) पटोले यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत, संबंधित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, असेही म्हटले आहे. सरकारने या प्रकरणात पारदर्शक तपास करावा आणि जनतेसमोर सत्य आणावे, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. (Ashok Kharat Case) दरम्यान, नाना पटोले यांच्या या आरोपांनंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता थेट राजकीय पातळीवर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. (Ashok Kharat Case)