Rohini Khadse : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे काळेकारनामे बाहेर आल्यानंतर राज्यभरात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले जात असून, खरातसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. अशातच काल त्यांनी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. राजीनामा सुपूर्त केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे खंडन करत यावर पुराव्यानिशी सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार गटाच्या महिलाअध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणून जास्त उडायचं नसतं! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch… असा इशारा दिला आहे. तसेच ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली ! शेवटी… कर्म असेही त्यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे यांनी एक्स अकाऊंटवरून असे ट्वीट केले आहे. हेही वाचा : Chakan News : सावधान! चाकणमध्ये उघड्यावर कचरा टाकला तर..; नगरपरिषदेने उचललं मोठं पाऊल नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे? Rohini Khadse Rohini Khadse गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल ! माझी मा .मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch… रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चाकणकर या अशोक खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. सोबतच चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल ! माझी मा.मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील… — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 20, 2026 राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? Rohini Khadse राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन करत अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला गुरु मानले होते. पण हे सगळे समोर आल्यानंतर मोठा धक्का बसला. एक महिला आहे म्हणून दोन दिवसांवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा : Dhurandhar 2: ‘धुरंधर २’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; दोन दिवसांत २०० कोटी पार, ‘पुष्पा २’लाही टाकलं मागे