Rahul Gandhi : कपड्यांवरून कंगणाची टीका अन् क्रितीच्या प्रत्युत्तराची सर्वत्र चर्चा; राहुल गांधींनीही दिला पाठिंबा
Rahul Gandhi : महिलांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ट्रोल करणं बंद करा - राहुल गांधी

Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अभिनेत्री क्रिती सेननचे समर्थन केले आहे. रक्षाबंधनच्या एका जाहिरातीच्या तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर तिच्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीतील कृतीचा इंडो-वेस्टर्न लुक पाहून त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी देखील कोणाचेही नाव न घेता जाहिरातीतील क्रितीच्या कपड्यांवरुन तिच्यावर टीका केली.
कंगनाच्या या पोस्टनंतर क्रितीनेही तिला सडेतोड उत्तर दिले. क्रिती सेनने हिने “महिलांनी काय कपडे घालावे हे सांगणं आपण कधी थांबवणार आहोत? एखाद्या महिलेचा तिच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलचा आदर तिच्या कपड्यांवरून का ठरवला जातो? संस्कृती आणि परंपरांविषयीचा आदर हा स्त्रीच्या मनात असतो, तिच्या कपड्यांच्या डिझाईनमध्ये नाही.”
क्रितीने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, “रक्षाबंधनाचा उत्सव हा सुरक्षेचा आणि प्रेमाच्या नात्याचा प्रतिक आहे. मी आणि माझी एकमेकांना राखी बांधते आणि एकमेकांची सुरक्षा, चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. माझ्यासाठी हे प्रेम, प्रार्थना आणि एकमेकांची काळजी घेण्याचं नातं आमच्या घरातील डॉग्ज पर्यंत पोहोचतं.”
वर्षानुवर्षे पारंपरिक फॅशनमध्ये बदल झाले असले तरी सांस्कृतिक परंपरांच्या बाबतीत महिलांच्या कपड्यांवरूनच त्यांचं मूल्यमापन केलं जातं. संस्कृती आणि परंपरा ही स्त्रियांच्या मनात असते. त्यांच्या कपड्यांमध्ये किंवा कपड्यांच्या नेकलाईनमध्ये नसते, ” अशा शब्दात क्रितीने कंगानाला उत्तर दिले . Rahul Gandhi
महिलांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ट्रोल करणं बंद करा
त्यानंतर राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर क्रिती सॅननच्या स्टोरीला रिपोस्ट करत म्हटलं की, “महिलांनी काय परिधान करावं, काय करायचं, कुठे जायचं हा त्यांचा निर्णय असला पाहिजे. महिलांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ट्रोल करणं बंद करा,” महिलांच्या कपड्यावर आणि त्यांच्या जीवनशैलीच्या निवडीवर टीका करणं योग्य नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
नेमका वाद काय?
एका दागिन्यांच्या ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीत क्रिती सेनन दिसली होती. या जाहिरातीत ती आयव्हरी रंगाची ब्रालेट आणि स्कर्टसह केप परिधान करून भावाच्या हातावर राखी बांधताना दिसते. जाहिरातीत तिचा पाळीव कुत्राही दिसत असून, नंतर क्रिती त्या कुत्र्याच्या पायालाही राखी बांधते. यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी तिच्या कपड्यांना पारंपरिक सणासाठी अयोग्य म्हटलं, तर काहींनी कुत्र्याला राखी बांधण्यावर आक्षेप घेतला.
तर कंगणाने पोस्टमध्ये म्हंटले की, “आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लहेंगा चोली, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले?” असा प्रश्न कंगनाने केला.
आजच्या महिलांकडे साडी, लेहेंगा, जीन्स असे कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग अशा वेळी तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल?” अशी टीका केली होती. त्यावर क्रितीने दिलेल्या उत्तराची चर्चा सर्वत्र सुरू आहे. Rahul Gandhi
हेही वाचा:






