Imtiaz Jaleel: बुलडोझर कारवाईनंतर इम्तियाज जलील आक्रमक; मतीन पटेलची पाठराखण करत म्हणाले “भाजपाच्या निवडून आलेल्या…”
Imtiaz Jaleel: 'गुंडगिरी करून तुम्ही घर पाडू शकता, मात्र आम्ही ते उभारू'

Imtiaz Jaleel: नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक छळप्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी निदा खानला अटक करण्यात आली. या प्रकरणात निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना मोठा झटका बसला. आज नारेगावातील मतीन पटेल यांचे घर बुलडोजर कारवाई करून पाडण्यात आले. त्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा संताप व्यक्त केला.
पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील म्हणाले, ” नारेगावमध्ये राहणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो, त्यांनी महानगर पालिकेने केलेल्या कारवाईला शांततेने प्रतिसाद दिला. मतीन कुटुंबीय यांनी फुलांचा वर्षाव केला तो त्यांना नव्हता, त्यांच्या अन्यायाला होता. माझा कोर्टाला प्रश्न आहे. मतीन यांच्या वकिलांनी 15 दिवसांची मुदत मागितली होती. मनपा प्रशासनाच्या वकिलांनी 7 दिवसाचा वेळ देतो म्हणून कोर्टात सांगितले होते. मग अशी काय घाई होती कि 24 तासात घर पाडण्यात आले?”, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
24 तासांच्या आत कारवाई
“मतीन पटेल यांच्या घरावर दुपारी 12 वाजता महापालिकेने नोटीस चिटकवली आणि 24 तासांच्या आत कारवाई केली. मी नारेगावला गेलो. त्यांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांच्या परिसरातील लोकांना भेटलो. मी सर्वांना एकच गोष्ट सांगितली की मतीनवर अजून आरोप सिद्ध झालेले नाही.
राजकीय पक्षाचे नेते आरोप सिद्ध करणार नाहीत. संघटना आणि मीडिया असे मिळून एका व्यक्तीवर आरोप करतात, त्याला दोषी ठरवतात, हे दुर्दैवी आहे. यामध्ये मतीनच्या आई-वडिलांची, त्याच्या पत्नी आणि मुलाची काय चूक आहे,?” असाही सवाल जलील यांनी केला.
पुन्हा अलिशान घर बांधून देणार’
“राज्यात उत्तर प्रदेशसारखं कल्चर सुरू आहे. आरोप झाले की त्याचे घर पाडायचं. जस्टिस गवई यांनी 2024 मध्ये या बाबत जजमेंट दिले आहे. हायकोर्टच्या न्यायाधिशांना हे मान्य आहे की नाही? हे गुंडाराज नाही तर काय आहे? पण ते घर आम्ही बांधून देणार आहोत.
सरकारलाही आम्हाला मॅसेज द्यायचा आहे, गुंडगिरी करून तुम्ही घर पाडू शकता, मात्र आम्ही ते उभारू, ज्या माणसाचं घर तुम्ही पडलं त्याला आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलेलं नाही. आम्ही त्याचं घर पुन्हा अलिशान बांधून देणार. प्रत्यकेाकडून लोकवर्गणी जमा करणार. आम्ही आमचे योगदान देणार आहोत,” असे म्हणत जलील यांनी पुन्हा मतीन पटेल यांची पाठराखण केली.
याशिवाय त्यांनी, शहरात 40 टक्के घर अनधिकृत आहेत. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बेकायदेशीर बांधकामांचे इतके पुरावे आहेत. यामध्ये महानगर पालिकांच्या अतिक्रमण विभागाने लिहून दिलं आहे की हे अनधिकृत आहे आणि ते तोडलं पाहिजे, नगरसेवकांवर कारवाई केली पाहिजे. पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असे म्हंटले आहे. Imtiaz Jaleel
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय आज (बुधवारी) पहाटे बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती.
मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते. त्यानंतर आज मतिन खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलं. Imtiaz Jaleel
हेही वाचा :






