Anjali Damania : भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर होत आहेत. आज सकाळी त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या आहेत. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते या रुपाली चाकरणकरांची चौकशी करणार असल्याची शक्यता असून, नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या वकिलांसोबत एसआयटीसमोर हजर होतील. या सगळ्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मोठी मागणी केली आहे. गेले दोन महिने मी खरात प्रकरण बघत आहे. यातले अनेक खुलासे लोकांसमोर येत नाही. जी माहिती मला मिळाली. ती मी एसआयटीच्या सातपुते मॅडम यांना दिली. तेव्हा 9 महिल्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, या चौकशीचे मी स्वागत करते. अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली पाहिजे. जेवढे आर्थिक व्यवहार झालेत ते बाहेर आले पाहिजे. काल रात्रीही मोठी माहिती माझ्याकडे आली आहे. ही माहिती आपण एसआयटीला दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता अंजली दमानिया याप्रकरणात कोणता गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी अनेकदा अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय कनेक्शन उघड करत बड्या राजकीय नेत्यांचे खरातसोबत फोनद्वारे बोलणे झाल्याचा दावा केला होता. आता पुन्हा एकादा त्यांनी तटकरे, शिंदे, आणि केसरकरांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तटकरेंवर गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुनील तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठिशी खंबीर उभे होते, असा गंभीर आरोप केला आहे. चाकणकरांच्या व्यवहारांची चौकशी करावी: दमानिया एकट्या रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी अशी विनंती एसआयटी आणि तर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केल्याचे दामानिया यांनी सांगितले. त्यांच्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या हे सुद्धा समोर आलं पाहिजे अशीही मागणी दमानिया यांनी केली आहे. हेही वाचा : Rupali Chakankar : एसआयटी चौकशीअगोदर रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाल्या…