Tanvi Kolte : बिग बॅास विनर होताच तन्वी कोलतेला मिळाली मोठी अॅाफर? व्हिडिओमुळे रंगली चर्चा
Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॅासच्या सहाव्या सिझनची विनर होताच तिला मोठी अॅाफर मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

Tanvi Kolte : बिग बॅास ( Bigg Boss )मराठीच्या सहाव्या सिझनचा काल शेवट झाला. गेल्या 100 दिवसांपासून सुरू असलेल्या या सिझनने प्रेक्षकांना खेळवून ठेवले. यंदाचा बिग बॅासचा विनर कोण होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते.
अखेर सहाव्या सिझनचा विजेत्याचा किताब सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तन्वी कोलते हिने आपल्या नावे केला आहे. ती बिग बॅासच्या सहाव्या सिझनची विनर झाली आहे. तिने विजेते पदाला गवसणी घातल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता तिला एक मोठी अॅाफर देऊ करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. Tanvi Kolte
या सिझनमध्ये एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक सदस्याचा खरा स्वभाव प्रेक्षकांसमोर आला आणि या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तन्वी जिंकणार असे पहिल्यापासून अनेकजण म्हणत होते. यामध्ये राखी सावंतचेही नाव होते. तिचा अंदाच खरा ठरला आहे. तन्वी जिंकल्यानंतर राखीने तिच्यासोबत एक व्हिडिओ करत तिला थेट हिंदी बिग बॅासची अॅाफर देऊन टाकली आहे. राखीच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.
नेमकं काय म्हणाली राखी सावंत? (Tanvi Kolte)
तन्वी कोलते ही बिग बॅासच्या सहाव्या सिझनची विनर झाल्यानंतर राखीने तिच्यासोबत एक व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओत राखीने तन्वीला हिंदी बिग बॅासची अॅाफर दिली आहे. व्हिडिओमध्ये राखी म्हणते “मी सगळ्यांना बोलले होते पहिल्या दिवसापासून की तन्वी जिंकणार. माझ्या जीभेवर तीळ आहे. बोलले होते मी हिला. यावर तन्वी म्हणते ‘राखीच्या जिभेवर तीळ आहे. आणि राखीकडे फार मोठं मन आहे. राखी मला म्हणाली होती की मी जिंकणार. बघा शंभर दिवसांनंतर आता माझ्या हातात ट्रॉफी आहे. आणि मी विजेती झाली आहे.
View this post on Instagram
यानंतर राखी म्हणते,’ सलमान भाई, तन्वी हिंदी बिग बॉसमध्ये जायला पाहिजे. आणि तेव्हा मी वाईल्ड कार्ड म्हणून येईल आणि तिची वाट लावेन. यानंतर तन्वीसह सगळे हसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या चर्चाचा विषय ठरत असून, सोशल मीडियावर तन्वी कोलते हिंदी बिग बॅासमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. Tanvi Kolte
हेही वाचा : Jasmine Sandlas: “गरजेपेक्षा जास्त दारू प्यायले…”, गायिका जैस्मीन सॅंडलसने सांगितला संघर्षमय प्रवास





