Deepika Padukone Good news : गुड न्यूज ! रणवीर सिंग आणि दीपिका दुसऱ्यांदा होणार आई-बाबा
Deepika Padukone Good news :

Deepika Padukone Good news : बॉलिवूड कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. दीपिका पदुकोणने एका गोड फोटोद्वारे दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गुड न्यूज दिली आहे. मुलगी दुआला जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी दीपिका पदुकोण पुन्हा गरोदर आहे.
दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग त्यांची मुलगी दुआला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. फोटोमध्ये रणवीरचा चेहरा दिसत नाही आणि दुआचा अर्धा चेहरा झाकलेला आहे.
यात चिमुकल्या दुवाच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट आहे. त्यावर पॉझिटिव्हच्या खुणा सुद्धा दिसत आहेत. दीपिकाने दुसऱ्यांदा गुड न्यूज शेअर करताच अनेकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 15 नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केले. त्यानंतर दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर 2024 रोजी मुलगी दुवा जन्म दिला होता. आता लग्नाच्या 8 वर्षांनी ते त्यांच्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत करणार आहे.
सध्या रणवीर सिंह त्याच्या ‘धुरंधर 2’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. अशावेळी दीपिका कुठेच दिसली नव्हती. आज अखेर दीपिकाने तिची दुसरी प्रेग्नंसी जाहीर करत प्रमोशनला जात नसल्याचे कारण स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
Pan card new rules 2026: गाडी ते घर खरेदीपर्यंत…; पॅन कार्ड नसेल तर अडकतील तुमची महत्त्वाची कामे





