BJP on Rahul Gandhi: ‘काँग्रेसचा हिंदुत्वविरोधी दृष्टिकोन’ ; मनुस्मृतीवरून भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
BJP on Rahul Gandhi: पुण्यात राहुल गांधी यांनी, मनुस्मृतीमध्ये महिलांचा अपमान करणारे श्लोक आहेत. मनुस्मृतीनुसार महिलांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुष नातेवाईकांच्या अधीन राहिले पाहिजे" असे म्हटले होते.

BJP on Rahul Gandhi: पुण्यात राहुल गांधी यांनी, मनुस्मृतीमध्ये महिलांचा अपमान करणारे श्लोक आहेत. मनुस्मृतीनुसार महिलांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुष नातेवाईकांच्या अधीन राहिले पाहिजे” असे म्हटले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता भाजपने हल्लाबोल केला आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. भाजप नेते अमित मालवीय, “काँग्रेस हिंदूविरोधी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे” असे त्यांनी म्हटले आहे. मालवीय यांच्यासोबतच भाजप नेते निशिकांत दुबे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
अमित मालवीय यांनी एका पोस्टमध्ये म्हटले, “हिंदूविरोधी चित्र निर्माण करण्यासाठी काँग्रेस हिंदू धर्मग्रंथांचा सोयीस्करपणे कसा अर्थ लावते, याचे काँग्रेसचे अधिकृत पोस्ट हे आणखी एक उदाहरण आहे. हिंदू धर्मात महिलांबद्दल काय म्हटले आहे, हे हिंदूंना सांगण्यापूर्वी राहुल गांधींनी आधी संपूर्ण मनुस्मृती वाचली पाहिजे.”असे म्हटले आहे.
Congress’s official post is yet another example of its selective and dishonest reading of Hindu scriptures to manufacture an anti-Hindu narrative.
Rahul Gandhi should first read the Manusmriti in its entirety before lecturing Hindus about what Hinduism supposedly says about… https://t.co/6KBEoCVQI1
— Amit Malviya (@amitmalviya) August 23, 2026
“राहुलने वादविवाद करण्यापूर्वी हिंदू धर्मग्रंथ वाचावेत” BJP on Rahul Gandhi:
ते म्हणाले, “जर राहुल गांधींना वादविवाद करायचा असेल, तर त्यांनी प्रामाणिकपणे धर्मग्रंथ वाचावेत, त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. इंग्रजीच्या चष्म्यातून भारतीय संस्कृती समजून घेण्याचा दावा कोणीही करू शकत नाही. हिंदुत्वाला राहुल गांधींकडून प्रमाणपत्राची गरज नाही. हा निव्वळ प्रचार आहे.”
बहन प्रियंका गांधी जी आपसे ज़्यादा समझदार है,अपनी गद्दी दे दीजिए ।सिद्धांत और उपदेश अपने घर से नहीं,दूसरों पर लागू होता है ।नेहरु जी ने अपने जीते जी @INCIndia का अध्यक्ष अपनी बहन विजय लक्ष्मी पंडित को नहीं बनाकर इंदिरा गांधी जी को बनाया ।1946 में सरोजिनी नायडू जी यानि महिला का… https://t.co/cH5MSyX9dM
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) August 23, 2026
निशिकांत दुबे यांनी काँग्रेस आणि राहुलवर टीका केली
निशिकांत दुबे यांनी याविषयी बोलताना, “भगिनी प्रियांका गांधी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत; तुमचे सिंहासन सोडा. तत्त्वे आणि शिकवण फक्त तुमच्या कुटुंबालाच नाही, तर इतरांनाही लागू होते. नेहरूंनी त्यांच्या हयातीत इंदिरा गांधींना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनवले, त्यांच्या बहीण विजयलक्ष्मी पंडित यांना नाही. १९४६ मध्ये, नेहरू एका महिला सरोजिनी नायडू यांना विरोध करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. १९५७ मध्ये, जेव्हा फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी संसदीय निवडणुकीसाठी उभे राहिले, तेव्हा तुमच्या कुटुंबाने फिरोज गांधींना पाठिंबा दिला होता.”असे म्हटलेआहे.
मनुस्मृतीबद्दल ते काय म्हणाले? BJP on Rahul Gandhi:
राहुल गांधी शनिवारी पुण्यात म्हणाले, “मी याठिकाणी मनुस्मृतीचा उल्लेख करू इच्छितो, ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, बालपणी स्त्री वडिलांच्या नियंत्रणाखाली असावी, तारुण्यात ती पतीच्या नियंत्रणाखाली असते आणि पतीच्या मृत्यूनंतर ती मुलांच्या नियंत्रणाखाली असते. स्त्री कधीही स्वतंत्र असू नये. हे शब्द लज्जास्पद आहेत. हे शब्द बोलले जाऊ नयेत.”





