Eknath Shinde : काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री मकरंद पाटील यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. यानंतर विधिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदार आक्रमक झाले होते. तर भाजप आमदारांनीही पलटवार केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर रात्री उशिरा एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली आहे. ही भेट विधानभवनात झालेल्या सातारा जिल्हा परिषद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हेही वाचा : Top 10 News: राज ठाकरे यांची सोशल मीडियावर बेधडक पोस्ट, मोदी 100 टक्के ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये आणि कोलंबियात ११० जवानांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, वाचा अशा टॉप १० बातम्या मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशावर सभापती राम शिंदे यांनी स्थगिती आणल्याने शिंदे गटात नाराजी पसरली असल्याचे म्हटले जात आहे. या भेटीत दोघांमध्ये याबद्दल चर्चा झाल्याची शक्यता आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिक मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे सातत्याने सांगितले जाते. या बैठकीच्या माध्यमातून उभय नेत्यांमध्ये समन्वय साधून या वादावर पडदा पडणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. आज विधानभवनाचे कामकाज सुरू झाल्यावर या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात आणि सरकारचे यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे लक्ष असणार आहे. शिदेंच्या मंत्र्याचा गंभीर आरोप सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत नाट्यमय घडामोडीनंतर झालेल्या राड्याची राज्यभरात चर्चा झाली. विधानसभेच्या अधिवेशानातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. थेट मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याने शिंदे गटात नाराजीचे वातावरण पसरले. पोलीस अधीक्षकांनी भाजपचे घरगडी म्हणून काम केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला होता. हेही वाचा : Aneet Padda: रॅम्प वॉकवरून अनित पड्डा ट्रोल; “अभिनय कर, मॉडेलिंग नाही!” म्हणत नेटकऱ्यांची टीका