Baramati By Election : जर शरद पवारांची राष्ट्रवादी ही निवडणूक लढवणार नसेल, तर त्यांनी तसे स्पष्ट करावे; आमच्याकडे सक्षम पर्याय उपलब्ध आहेत, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादीला आपली भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले. रायगडमधील महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सपकाळ यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आवाहन केले. यापूर्वी बारामती विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तुतारी चिन्हावर लढवली होती. Baramati By Election मात्र, आता या जागेवर काँग्रेसनेही दावा केल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याआधीच संकेत दिले होते की, राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेस ही जागा लढवेल. अंतिम निर्णय महाविकास आघाडी घेणार असली, तरी सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे आघाडीतील अंतर्गत ओढाताण पुन्हा एकदा समोर आली आहे. Baramati By Election Harshwardhan Sapkal बारामतीमध्ये ही निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा असतानाच, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. हाके यांनी थेट अजित पवार गटाला आव्हान दिले असून, सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर पाठवा आणि विधानसभेसाठी पवार कुटुंबाबाहेरचा उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. आपण ही निवडणूक लढवून जिंकून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. काँग्रेसची आक्रमक भूमिका आणि लक्ष्मण हाके यांची एन्ट्री यामुळे बारामती पोटनिवडणूक आता तिहेरी लढतीकडे झुकताना दिसत आहे. शरद पवार गट यावर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Baramati By Election