Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाचं आगमन; साधेपणात गणरायाचं स्वागत
Nana Patekar: गणेशोत्सवाची साधी आणि पारंपरिक झलक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे

Nana Patekar: महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या थाटामाटात गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून, मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या घरी साधेपणाने गणरायाचे स्वागत केले. भक्तिमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. (Nana Patekar)
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणताही दिखावा न करता साधेपणाने गणरायाचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या घरातील गणेशोत्सवाची साधी आणि पारंपरिक झलक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Nana Patekar)
दरवर्षी नाना पाटेकरांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनासाठी अनेक राजकीय पाहुणे मंडळी देखील उपस्थिती लावत असतात. नानांच्या घरी सुरुवातीपासूनच म्हणजे त्यांच्या वडिलांनी जेव्हा गणपतीची प्रतिष्ठापणा सुरु केली तेव्हापासून इकोफ्रेंडली गणपतीच आहे. त्यांच्या घरी शाडूचाच गणपती असतो. (Nana Patekar)
हेही वाचा:





