Arjun Tendulkar Wedding date announce : क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिनचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अर्जुन आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली असून, मार्च महिन्यात हा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ऑगस्टमध्ये झाला होता गुप्त साखरपुडा – अर्जुन आणि सानिया यांनी ऑगस्ट २०२५ मध्येच आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली होती. अत्यंत खाजगी स्वरूपात पार पडलेल्या एका ‘सीक्रेट’ सोहळ्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमाला केवळ कुटुंबातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. आता हे नाते लग्नाच्या बेडीत रूपांतरित होणार आहे. कोण आहे सानिया चंडोक? सानिया चंडोक ही एक यशस्वी उद्योजिका (Entrepreneur) असून ती मुंबईतील प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. सानिया मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया गेल्या अनेक वर्षांपासून तेंडुलकर कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक मानली जाते. हेही वाचा – ICC Rule : बांगलादेश आपल्याच जाळ्यात अडकला; आयसीसीचा ‘तो’ नियम येणार अंगलट सचिन तेंडुलकर यांनी स्वतः दिली कबुली – अर्जुनच्या साखरपुड्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा होत्या. मात्र, स्वतः सचिन तेंडुलकर यांनी ‘Reddit AMA’ (Ask Me Anything) सेशन दरम्यान या वृत्ताला दुजोरा दिला. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन म्हणाले, “हो, अर्जुनचा साखरपुडा झाला आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्या आयुष्यातील या नवीन टप्प्यासाठी खूप उत्सुक आहोत.” असे असेल लग्नाचे वेळापत्रक – मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे विधी ३ मार्च २०२६ पासून सुरू होतील, तर मुख्य विवाहसोहळा ५ मार्च २०२६ रोजी पार पडण्याची शक्यता आहे. जरी संपूर्ण जगाचे लक्ष या लग्नाकडे असले, तरी हा सोहळा अत्यंत खाजगी (Private) ठेवण्यात येणार आहे. मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यात केवळ कुटुंब, जवळचे मित्र आणि क्रिकेट विश्वातील काही मोजक्याच दिग्गजांना निमंत्रण असणार आहे. हेही वाचा – Vaibhav Suryavanshi Century : वर्ल्ड कपपूर्वी वैभवचे वादळ; द. आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ६३ चेंडूत ठोकले स्फोटक शतक! आयपीएलमध्येही नवा संघ – वैयक्तिक आयुष्यासोबतच अर्जुनच्या प्रोफेशनल लाईफमध्येही मोठे बदल झाले आहेत. नुकतेच अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघात ट्रेड करण्यात आले आहे. आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी अर्जुन आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू करणार आहे.