Sanjay Raut : ‘अमित शाह हे ज्ञानेश कुमारचे बॉस’ : संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, सगळचं काढलं…
Sanjay Raut : याच मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut criticizes Gyanesh Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवतीचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असून, काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
याच मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ज्ञानेश कुमार यांचे ‘बॉस’ असल्याचा दावा राऊत यांनी केला. तसेच ज्ञानेश कुमार निष्पक्षपणे काम करत नसून सरकारच्या बाजूने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘निवडणूक आयोग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे’
संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ज्ञानेश कुमार यांचे बॉस आहेत आणि निवडणूक आयोग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. फॉर्म-६ मध्ये करण्यात आलेल्या बदलांवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले.
‘बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांवरही प्रश्न’
संजय राऊतांनी बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे या निवडणुकांबाबत संशय निर्माण झाला असून, या निवडणुकांबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची भूमिकाही राऊत यांनी मांडली.
दोन आयुक्तांच्या आक्षेपांवरून वाद
एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकात दिलेल्या बातमीनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत निवडणूक आयोगातील विविध निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, निवडणूक डेटाबेसचा वापर आणि फॉर्म-६ मधील बदल यांसारख्या मुद्द्यांशी संबंधित होते.
हे वृत्त समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आयोगातील मतभेद हे निर्णय प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानेही दोन आयुक्तांनी काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली असली तरी आयोगाचे अंतिम निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीने एकमताने घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले….
संजय राऊत यांनी मात्र या स्पष्टीकरणावर टीका केली. ते म्हणाले “मतभेद असणं म्हणजे १३ कोटी मतदारांची नावे हुकूमशाही पद्धतीने डीलिट करणं असं होत नाही. दोन निवडणूक आयुक्तांनी विरोध केला आहे. सहमती असेल तर एक विरुद्ध दोन आहे ना?ठ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Noida Bus Fire: ग्रेटर नोएडा बस आगीचा भीषण व्हिडिओ समोर ; प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव





