मुंबई – नगरपालिका, महापालिकानंतर आता राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 21 जानेवारी ही शेवटची तारीख होती. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी तब्बल 7695 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी 13023 असे विक्रमी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या जांगासाठी पाच फ्रेब्रुवारीला मतदान, तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज हे धाराशीवमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी जिल्हापरिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सुमारे 967 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. धाराशीव पाठोपाठ कोल्हापूरात दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 907 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 853 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी उमेदवारी अर्ज हे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झाले आहेत. या ठिकाणी 56 जागांसाठी 226 उमेदवारी अर्ज आले आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकासाठी ही उमेदवारी अर्जांचा जणू पाऊस पडला आहे. 1462 जागांसाठी तब्बल 13023 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज हे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी आले आहेत. जिल्ह्यात पंचायत समितीच्या 136 जागांसाठी तब्बल 1529 अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात पंचायत समितीच्या 146 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यासाठी जवळपास 1482 अर्ज दाखल झाले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी 126 जागांसाठी तब्बल 1456 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे नाव – जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य संख्या – दाखल झालेले नामनिर्देशन पत्रे सदस्य संख्या – दाखल झालेले नामनिर्देशन पत्र रायगड – ५९ – ३९१ – ११८ – ६९७ रत्नागिरी – ५६ – २२६ – ११२ – ४४४ सिंधुदुर्ग – ५० – २७२ – १०० – ४४१ पुणे – ७३ – ८५३ – १४६ – १४८२ सातारा – ६५ – ६३२ – १३० – १०५९ सांगली – ६१ – ७४६ – १२२ – १२८९ सोलापूर – ६८ – ७५६ – १३६ – १३७१ कोल्हापूर – ६८ – ९०७ – १३६ – १५२९ छत्रपती संभाजीनगर – ६३ – ७६२ – १२६ – १४५६ परभणी – ५४ – ५८६ – १०८ – ९४४ धाराशिव – ५५ – ९६७ – ११० – १३६० लातूर – ५९ – ५९७ – ११८ – ९५१ एकूण – ७३१ – ७६९५ – १४६२ – १३०२३