Yogi Adityanath on SIR। उत्तर प्रदेशातील एसआयआरबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचा पक्ष म्हणजेच भाजप पूर्णपण सक्रिय आहेत. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी,”एसआयआरबाबत दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ते योग्यरित्या न केल्यास तुमच्यासाठी धोक्याचा संकेत ठरू शकतो आणि त्याचे परिणाम पुढील २० वर्षांपर्यंत भोगावे लागतील” असा थेट इशाराच त्यांच्या आमदारांना दिला आहे. लखनौमध्ये एसआयआरबाबत भाजपची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस आणि केंद्रीय प्रभारी तरुण चुघ यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत भाजपने ,”ज्या मतदारसंघांमध्ये एसआयआर योग्यरित्या लागू केला जात नाही त्या मतदारसंघातील आमदारांची तिकिटे रद्द केली जातील” असा इशारा दिला आहे, त्यामुळे त्याठिकाणच्या सर्वच आमदारांवर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री योगींचा एसआयआरबाबत इशारा Yogi Adityanath on SIR। या बैठकीत मुख्यमंत्री योगींनी सर्व मंत्री, आमदार, राज्य आणि बूथ-स्तरीय कार्यकर्त्यांना इशारा दिला. ज्यामध्ये त्यांनी एसआयआर योग्यरित्या लागू न केल्यास त्यांच्यासाठी धोक्याचा संकेत असू शकतो. अशा अनेक जागा आहेत जिथे विजय आणि पराभवाचे अंतर चार ते पाच हजारांपेक्षा कमी होते. अशा परिस्थितीत, थोडीशीही निष्काळजीपणा आपल्या जागा गमावू शकतो”असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यशाळेत काही विधानसभा जागांचा उल्लेख केला आणि वगळलेल्या नावांचा डेटा शेअर केला. त्यांनी सांगितले की, लखनौ कॅन्ट आणि उत्तर, आग्रा दक्षिण, मिल्कीपूर, हरदोई आणि लखीमपूरसह तीन डझनहून अधिक मतदारसंघांमध्ये २०% पेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कडक सूचना Yogi Adityanath on SIR। मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित मतदारसंघात जाऊन ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या सर्व मतदारांची नावे एसआयआरमध्ये समाविष्ट करावीत, अनुपस्थित किंवा स्थलांतरित झालेल्यांना समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि विरोधकांकडून बनावट नावे समाविष्ट करण्यावर लक्ष ठेवावे आणि आक्षेप नोंदवावेत असे आदेशही यावेळी दिले. त्यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले, “जर तुम्ही हे करू शकत नसाल तर मला कळवा, आमच्याकडे तुमच्यासाठी काम करणारे अधिक लोक आहेत.” त्यांनी अशा मतदारसंघांबद्दल चिंता व्यक्त केली जिथे पारंपारिकपणे भाजपच्या जागा आहेत, परंतु जिथे सर्वाधिक मतदारांची नावे मृत किंवा अनुपस्थित म्हणून सूचीबद्ध केली गेली आहेत. तथापि, अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये, कमी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी म्हणाले, “हा परीक्षेचा काळ आहे. १००% गुण मिळवणाऱ्यांनाच उत्तीर्ण मानले जाईल.”