Mayor of Mumbai : मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. २२ जानेवारीला मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यानंतर भाजपकडून महापौर पदासाठी अनेक नावे आघाडीवर आहेत. या सगळ्यात आता महापौर पदाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेच्या निवडणुकीनंतर २७ जानेवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. मात्र, भाजप आणि शिवसेना युतीबाबत एकत्रित गट स्थापन होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. यासोबतच पक्षाची गटनोंदणी पूर्ण झालेली नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महापौर पदाची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. हेही वाचा : Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! भरधाव स्कॉर्पिओ झाडावर आदळली; एकाचा मृत्यू, ३ गंभीर जखमी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. ८९ जागांवर भाजपने विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ २९ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘हॅाटेल पॅालिटिक्स’ची रणनिती आखली. ज्याची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली. एकनाथ शिंदेंनी महापौर पदावर दावा केला असल्याची चर्चा झाली. यासोबतच स्थायी समिती अध्यक्षपदावर दावा केला आहे. मुंबई महापालिका या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय स्पष्टता येणे अवघड आहे. त्यामुळे पक्षातील बड्या नेत्यांकडून तोडगा काढण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांची गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपकडून महापौर पदासाठी अनेक नावे चर्चेत असून, जोरदार लॅाबिंग सुरू झाले आहे. भाजप महापौर पद आपल्याकडे ठेवणार असून उपमहापौर पद शिंदेंच्या शिवसेनेला दिले जाणार असल्याची चर्चा आहे. महापौर पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे समजते. तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शीतल गंभीर ही नावे महापौर पदाच्या रेसमध्ये आहेत. मात्र, भाजप पक्ष धक्कातंत्र देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या नावाला संधी मिळणार की अनपेक्षितपणे भाजप चर्चत नसलेल्या नावाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा :Donald Trump hand blue spot: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावरील जखमेमागचं सत्य काय? व्हाईट हाऊसची मोठी हेल्थ अपडेट