Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन रुपाली चाकणकर यांना पायउतार व्हावे लागले. चाकणकरांचे खरातसोबत फोटो व्हायरल झाले होते. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण त्यांना गुरु मानत असल्याचे सांगत जे आरोप करण्यात येत आहेत त्याचे खंडन केले होते. आता या प्रकरणामुळे त्यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांचे महिला आयोगाच्या पदावर गच्छंती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन त्यांना हटवले जाऊ शकते. तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत निम्माहून अधिक आमदारांसह नेत्यांकडून पक्षाची बदनामी रोखायची असेल तर चाकणकर यांचा राजीनामा घेणेच योग्य राहील, अशी भूमिका घेतल्याची माहिती आहे. Rupali Chakankar Rupali Chakankar : सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेणार? रुपाली चाकणकरांना दुसरा झटका बसण्याची दाट शक्यता; हालचालींना वेग आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासमोर ही भूमिका मांडल्याचे समजते. विशेषतः भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादामुळे पक्षावर टीकेची झोड सुरू झाली असून त्याचा फटका थेट पक्षाच्या प्रतिमेला बसत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आता सुनेत्रा पवार रुपाली चाकणकर यांच्याकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद काढून घेणार का ? त्या नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Rupali Chakankar अशोक खरातच्या अत्यंत विकृत कारनामे समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो असल्याने ते व्हायरल झाले. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकरांचा देखील फोटो होता. काही व्हिडिओ समोर आले, त्यातील एका व्हिडिओत त्या चक्क खरातचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. यामुळे त्या अडचणीत सापडल्या असून, विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. आरोपांच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पत्र लिहित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्याकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष पद गेल्यास त्यांच्या राजकीय वाटचालीस मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : Purple Day 2026: मिर्गी म्हणजे अंधश्रद्धा नाही; ‘पर्पल डे’ने बदलतोय समाजाचा दृष्टिकोन